कोरोना व्हायरसमुळे कच्चा तेलाच्या किंमती खूपच कमी झाल्या आहेत. जर सरकारने यावर कर वाढवला नाहीतर डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती प्रती लीटरने प्रत्येकी 6 रुपयांनी कमी होऊ शकतात. कोरोना व्हायरसमुळे या वर्षाच्या सुरूवातीपासूनच कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, डिसेंबरमध्ये बास्केट क्रुडची किंमत 65.5 डॉलर प्रति बॅरल होती. तर मार्चमध्ये किंमत कमी होऊन 33.5 डॉलरपर्यंत आली. यानंतर 14 मार्चला पेट्रोल-डिझेलवर प्रती लीटर प्रत्येकी 3 रुपये आणि 24 मार्चला प्रत्येकी 8 रुपयांनी वाढ झाली आहे.
पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ञांनानुसार, केंद्र सरकारने इंधनावरील कर न वाढवल्यास इंधन प्रती लीटर 6 रुपयांनी कमी होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमत 1 डॉलर प्रती बॅलरने कमी झाल्यास पेट्रोल-डिझेलची किंमत 50 पैसे प्रती लीटर कमी होत असते. त्यामुळे प्रती बॅलर 12 डॉलरने स्वस्त झाला असल्याने, इंधन 6 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया देखील घसरला आहे. अशा स्थितीत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. 1983 नंतर पहिल्यांदाच कच्चा तेलाचे भाव शून्यापेक्षा खाली गेले आहेत. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत कच्चा तेलाची मागणी कमी असल्याने कच्चा तेलाचे भाव -$37.63 प्रती बॅरल पोहचले आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel