केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक नवे ‘चॅलेंज’, त्यांच्या फॉलोअर्ससाठी दिले आहे. स्मृती इराणी यांनी या पोस्टमध्ये स्वतःचे छायाचित्र अपलोड केले असून, त्याखाली एक कॅप्शन देखील आहे. या दोन्ही गोष्टी कोणते हिंदी गीत सुचवितात हे ओळखण्याचे ‘संगीतमय कोडे’ स्मृती इराणी यांनी आपल्या फॉलोअर्सना घातले होते. स्मृती इराणी यांची ही पोस्ट इन्स्टाग्रामवर त्वरित व्हायरल झाली असून त्याच्या फॉलोअर्सनी झटपट प्रतिक्रिया देत अनेक गीते सुचविली आहेत.
स्मृती इराणी यांनी आपल्या छायाचित्राच्या सोबत ‘व्हेन झरोखा इज नॉट ‘अखियोंवाला’..’ असे कॅप्शन देत योग्य गीत ओळखण्याचे आव्हान आपल्या फॉलोअर्सना दिले होते. इराणी यांच्या या पोस्टला अवघ्या दोनच तासांच्या अवधीमध्ये तब्बल चोवीस हजारांहूनही अधिक ‘लाईक’ आले असून, त्यांच्या फॉलोअर्सनी छायाचित्राला योग्य अशी गीते सुचविण्याचा सपाटा लावला होता. यामध्ये ‘अखियोंने झरोखे से’ इथपासून ते अगदी ‘अखियोंसे गोली मारे’ इथवर सर्व गीते स्मृती इराणी यांच्या फॉलोअर्सनी आपल्या प्रतिक्रियांच्या मार्फत सुचविली होती.
स्मृती इराणी इस्टाग्रामवर अतिशय सक्रीय असून, वेळोवेळी मोठ्या रोचक पोस्ट्स आणि मीम्स, त्या आपल्या फॉलोअर्स सोबत शेअर करीत असतात. स्मृती इराणी यांचे इन्स्टाग्रामवर सहा लाख फॉलोअर्स आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel