पुणे शहर आणि जिल्ह्यातील भाजप सदस्य नोंदणीबाबत अद्याप फारशी प्रगती झाली नसल्याची खंत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केली. सत्तर लाखांचे उद्दिष्ट पार करण्यासाठी आमदारांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले. पुणे शहर आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक संध्याकाळी महापौर बंगल्यावर झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

भाजपाच्यावतीने सध्या राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.पुणे शहरातील सदस्य नोंदणीचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला. तसेच आगामी निवडणूकांच्या पार्शवभूमीवर शहरातील पक्षाची बांधणी आणि नियोजन याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. सदस्य नोंदणी बाबत फारसे काम झाले नसल्याचे यावेळी लक्षात आल्यावर पाटील यांनी नाराजी व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही सदस्य नोंदणी किती महत्त्वाची आहे याची माहिती दिली. राष्ट्रीय व राज्य पातळीवर पक्षाच्यावतीने जे कार्यक्रम राबविले जातात ते आपल्या मतदारसंघात प्रत्येक आमदार व पदाधिकाऱ्यांनी राबविले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.                                                                                                     

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: