इटालियन कंपनीच्या लोम्बार्गिनी या सुपरकार जगभरात विकल्या जात आहेत तश्या भारतातही विकल्या जात आहेत. पण देशात या कार्स कोणत्या शहरात सर्वाधिक संख्येने विकल्या जात असतील असे विचारले गेले तर आपण जो अंदाज करू तो कदाचित चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. लोम्बार्गिनीने भारतात मुंबई, दिल्ली आणि बंगलोर येथे त्यांच्या शोरूम सुरु केल्या आहेत आणि विशेष म्हणजे मुंबई दिल्लीत नाही तर बंगलोरच्या शोरूम मधून या महागड्या लग्झुरीयस कार्स सर्वाधिक संख्येने विकल्या जात आहेत. लोम्बार्गिनीच्या कार्स ३.१ कोटी ते ५.३ कोटी रुपये किमतीच्या आहेत.
ऑटो सेक्टर भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा विभाग राहिला आहे. दरदिवशी रस्त्यावर भर पडत असलेली वाहन संख्या त्याचा पुरावा म्हणता येईल. मात्र भारतात अजून लग्झरी कार्स ही श्रीमंत वर्गाची मक्तेदारी राहिली आहे. लोम्बार्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल म्हणाले, दक्षिण भारतात हे चित्र थोडे वेगळे आहे. येथे आयटी हब आहेत आणि परदेशी गुंतवणूक वेगाने वाढते आहे. परिणामी नवउद्योजक अधिक संख्येने आहेत आणि हाच वर्ग लोम्बार्गिनीचा खरेदीदार होत आहे. एकूण देशात जेवढ्या लोम्बार्गिनी विकल्या जात आहेत त्यात ५० टक्के वाटा बंगलोर शोरूमचा आहे.
लोम्बार्गिनी जगभरात तीन मॉडेल्स विक्री करते. त्यात एसयुव्ही उर्स, हुरकेन आणि अॅव्हेंटडोर यांचा समावेश आहे. बंगलोरच्या ग्राहकाने पहिली ६३ लिमिटेड एडिशन अॅव्हेंटडोर खरेदी केली होती तर दुसरी लिमिटेड एडीशन एसव्हीजे ९०० चा भारतातील पहिला ग्राहक बंगलोर येथीलच आहे. या सर्व कार्स इटली मधील एकाच कारखान्यात तयार केल्या जातात आणि फुलबिल्ट कार्सच जगभर निर्यात होतात. या कार्स भारतात येईपर्यंत त्यांच्या किमती ३.५ पटीने वाढतात असेही अग्रवाल म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel