मध्य प्रदेशात सध्या राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. कमलनाथ सरकारवर सत्ता गमवण्याचे संकट येऊन ठेपलं आहे. अशातच राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना उद्याच बहूमत सिद्ध करा नाहीतर अल्पमताचे सरकार मानले जाईल अशा स्वरूपाचे एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
तसेच कमलनाथांनी उद्या जर बहूमत सिद्ध केलं नाही तर मग अल्पमताचे ग्राह्य धरल्या जाईल. त्यामुळे कमलनाथांवर आता सत्ता गमवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दुसरीकडे या संदर्भात भाजपने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel