महाराष्ट्रात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे इतर अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणाही झाली. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील तर त्यांचे स्वागतच करायला हवे. अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितल आहे.
महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खातेवाटप होण्यास विलंब होत आहे. यावर आज संध्यकाळ किंवा उद्या हे खातेवाटप होऊ शकत. अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली आहे. दरम्यान, मंत्रीपदाच्या नाराजी नाट्यावर देखील पवार यांनी मिश्कील टिपण्णी केली आहे.
महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रीपदावरून नाराज नाही. उलट मी अनेकांना गृहखाते हवे का, अशी विचारणा केली, परंतु कोणीच तयारी दर्शवली नाही. म्हणजे आमच्याकडे मंत्रिपद नको म्हणणारे अधिक आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी मिश्किल टिपण्णी शरद पवार यांनी नगरमध्ये केली.
click and follow Indiaherald WhatsApp channel