आरे वृक्षतोडीला राणा भीमदेवी थाटात विरोध करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी निवडणूक येतच आपला पवित्रा बदलला आहे. आचारसंहितेमुळे साऱ्यांचे हात बांधलेले असतात, असे सांगत त्यांनीं अधिक भाष्य करणे  टाळले.

आरेतील कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ताफ्याला शुक्रवारी रात्री सुरुवात झाली. मुंबईतील ऑक्सिजन संपवणार का सवाल करत पर्यावरणप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत;

आदित्य ठाकरे यांनी याबाबत सुरवातीला संघर्षाची भूमिका घेतली होती. मात्र आता प्रत्यक्षात वृक्ष तोड सुरु असताना ते प्रचारात मग्न आहेत.

पर्यावरण वाद्यांनी इंदर्शने केल्यावर त्यांनी आचारसंहितेमुळे आमचे हात बांधले आहेत असे सांगितले. या उत्तराने त्यांनी स्वतःची मन सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना   पर्यावरणप्रेमींच्या रोषाला सामो जावे लागले.

पर्यावरणप्रेमींकडून त्यांना आरे वृक्षतोडीच्या विरोधात पोस्टर दाखवण्यात आले. त्यावेळी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना अटक करणे चुकीचे आहे. सरकारने झाड वाचवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवू नये, अशी मखलाशी त्यांनी केली.                                                                                                                                           


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: