महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांत निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.
महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, आसाम आणि बिहार या राज्यांतील पूरस्थिती गंभीर आहे. लाखों नागरिक पुरामुळे अडकून पडले आहेत किंवा विस्थापित झाले आहेत. गरजू पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी आणि पुराचे पाणी लवकर ओसरावे यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन मी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना करतो, असा संदेश राहुल यांनी ट्विटरवरून जारी केला. केरळमधील वायनाड या आपल्या लोकसभा मतदारसंघात जाता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
पुरामुळे वायनाडमधील जनतेलाही झगडावे लागत आहे. मतदारसंघाला भेट देण्याची माझी इच्छा आहे. मात्र, माझ्या उपस्थितीमुळे मदतकार्यात अडथळे येऊ शकतात असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आता अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर मी तिथे जाईन, असेही राहुल यांनी स्पष्ट केले.
click and follow Indiaherald WhatsApp channel