आपल्या बोल्ड लुकमुळे बऱ्यावेळा अभिनेत्री इलियांना डिक्रूझ चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा कोणताही फोटो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सध्या सिनेसृष्टीपासून दूर असलेली इलियाना अंदमान-निकोबारमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच बोल्ड बिकिनी अवतार दिसत आहे.

सोशल मीडियावर इलियानाचा हा बिकिनी लुक खूप व्हायरल होत असून तिच्या या लुकचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत. इलियानाची ही अशाप्रकारे बोल्ड फोटो शेअर करण्याची पहिलीच वेळ नाही. नेहमीच बिकिनीतील फोटो ती तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

इलियाना आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेते. अनेकदा सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट व्हिडीओ सुद्धा व्हायरल होताना दिसतात. या फिटनेसमुळे तिच्या बिकिनी लुकची सर्वाधिक चर्चा होते. इलियानाचे काही काळापूर्वीच ब्रेकअप झाले होते. सोशल मीडियावरूनच तिने अँड्र्यू नीबोनसोबतचे नाते संपुष्टात आल्याचे सांगितले होते.

https://www.instagram.com/p/B9JlpjOg7Xb/?utm_source=ig_embed
click and follow Indiaherald WhatsApp channel