संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठीयावाडीचे पहिले पोस्टर रिलीज झाले असून त्यात गंगूबाईची भूमिका आलीय भट्ट साकारणार आहे. भन्साळी यांच्यासोबत आलीयाचा हा पहिलाच चित्रपट आहे. एफ हुसेन जैदी यांचा माफिया क्वीन ऑफ मुंबई या कादंबरीवरून हा चित्रपट तयार केला जात असून ही एक सत्यघटना आहे.
कामाठीपुऱ्यात एकेकाळी जिचा वचक होता अश्या एका कोठीवालीची ही कथा आहे. गुजराथच्या काठियावाड प्रांतातील एका सधन घरातील ही मुलगी. १६ व्या वर्षी ती घरी काम करणाऱ्या अकौंटंच्या प्रेमात पडली. तिला हिरोईन व्हायचे होते. या माणसाने तिला लग्नाचे वचन देऊन मुंबईत आणले आणि ५०० रुपयात विकून टाकले. वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या या मुलीने कोठीवाली बनून अनेक सेक्सवर्कर आणि अनाथ मुलांसाठी मोठे काम केले. मर्जीविरुद्ध या व्यवसायात आलेल्या मुलींची तिने सुटका केली.
त्यावेळचा माफिया करीमलाला याच्या एका चेल्याने गंगूबाईवर रेप केला तेव्हा तिने करीमकडे इन्साफ मागितला आणि त्याने तिला बहिण मानले तेव्हा तिने करीमला राखी बांधली. करीमशी हे नाते जुळल्याने संपूर्ण कामाठीपुरा तिच्या ताब्यात आला होता अशी ही कथा. आलिया गंगूबाईची भूमिका कशी साकारेल याची रसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. आलियाचा कलंक चित्रपट फ्लॉप ठरला आहे तर तिचा आगामी चित्रपट आहे ब्रह्मास्त्र.
click and follow Indiaherald WhatsApp channel