पुणे : सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी एका सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

 

याच पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप, मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारीस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून बोलले, आपण १५ कोटी आहोत, पण १०० कोटीला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट! अशा इशारा दिला. त्यानंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन एमआयएम पक्षाला दोषी ठरवत एमआयएम हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, ‘एमआयएम ही भाजपची बी टीम,’ अशी टीका त्यांनी केली.

 

दरम्यान, ‘भाजपचे नेते वारंवार सरकारविरोधात बोलत आहेत. मात्र भाजपची ही पराभूत मानसिकता आहे. आपल्या पक्षातील आमदार टिकावे यासाठी ते सरकारविरोधात विधानं करत आहेत. निवडणुकीअगोदर ते पुन्हा येणार, असे नारे देत होते. मात्र ते पुन्हा आलेच नाहीत,’ असा खोचक टीका त्यांनी भाजपवर लगावला.                   

 

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: