वैद्यकीय क्षेत्रात केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. देशात नवीन 75 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत.तर 15 हजार डॉक्टरांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत जावडेकर म्हणाले की, देशातील वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची असलेली कमतरता लक्षात घेऊन 75 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये, ज्याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्याठिकाणी प्राधान्यक्रमाने हे महाविद्यालय बांधण्यात येणार आहेत. तर, या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 15 हजार डॉक्टरांची भरती करण्यात येईल.
दरम्यान या साऱ्या विकासासाठी 24 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर, सन 2020-21 पर्यंत या महाविद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी तरतूद आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबतही केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात 60 लाख मेट्रीक टन ऊस उत्पादन करण्यासाठी एक्सपोर्ट (निर्यात) सबसिडी देण्यात येणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel