शिवसेना आता वाघांचा पक्ष राहिला नसून शेळ्या – मेंढ्यांचा पक्ष राहिला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी ही टीका केली आहे.
नारायण राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेना ही शिवसेना होती. पण, आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही.त्यामुळे पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येतं, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे.
त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत.तसेच लवकरच मी भाजपात प्रवेश करणार आहे. मात्र माझ्या पक्षप्रवेशात शिवसेना आडकाठी घालत आहे. कारण उद्धव ठाकरे यांना चांगल बघवत नाही, असा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.
दरम्यान गेले काही दिवस नारयण राणे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे भाजपात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
मात्र भाजप – शिवसेना युती असंल्याने नारायण राणे हे शिवसेनेसाठी अडसर ठरणार आहेत. त्यामुळे शिवसेना नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असल्याच बोललं जात आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel