द्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आणि नाराजी नाट्य उफाळून आले. त्यातच आज राज्याचे नवनिर्वाचित मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांत रंगल्या आहेत या विषयावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांना खातेवाटपादरम्यान दुय्यम खाती देण्यात आली असून त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. ते जर भाजपात आले तर त्यांचे निश्चितच स्वागत करु या शब्दात राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेल्या दुय्यम खात्यामुळे ते प्रचंड नाराज असून आठवड्याभरात ते धक्कादायक निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसमध्ये बोलले जात आहे. याच अनुषंगाने बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांना भाजपात येण्याचे निमंत्रणच दिले आहे.
वडेट्टीवार यांच्याकडे महत्त्वाची खाती येतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत. यामुळे वडेट्टीवारदेखील नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत मतदान केल्यानंतर बावनकुळे यांनी त्यांची भावना मांडली.
click and follow Indiaherald WhatsApp channel