भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पक्षात प्रवेश देणं योग्य नसल्याचं, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. काल एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना, त्यांनी हे मत नोंदवलं. पक्षानं उमेदवारी दिल्यास, मुक्ताईनगर मतदार संघातूच विधानसभेची निवडणूक लढवू, असं खडसे यांनी नमूद केलं.

लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळे सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांनीही कार्यकर्त्यांच्या बैठका, सभा आणि मेळावे घेण्यात व्यस्त आहेत. भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु असून जोरदार इनकमिंग सुरु आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला मोलाचा सल्ला दिला आहे.

दरम्यान,काल माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी ‘मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून मीच इच्छुक आहे आणि पक्षाकडे मीच उमेदवारीची मागणी करणार आहे’ असे खडसे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार पक्षांतर झालेले आहे त्यामुळे याविषयी बोलताना ‘भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासल्यास निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही. तसेच पक्षात येण्यापूर्वी नेत्यांची निष्ठा तपासा असे ते म्हणाले.                                     

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: