मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे, ते बहाल करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सरकार करेल. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. आम्ही यामध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

सरकार कुठं चुकत असेल तर जरुर सरकारला सांगू. पण सरकारला या संदर्भात पाठिंबा देऊ. तात्काळ या संदर्भातील कायदेशीर निर्णय केले पाहिजे, असंही फडणवीसांनी सांगितलंय.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणात सर्व पक्ष सोबत आहोत. यासाठी तज्ज्ञांशी संवाद सुरू असून आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या जवळ आलो आहोत. दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: