सध्या सोशल मीडियावर 60 वर्षीय अभिनेत्री नीना गुप्ता यांचा फ्रॉकमधील बोल्ड फोटो व्हायरल होत आहे. नीना गुप्ता या फोटोमध्ये अतिशय बोल्ड दिसत असून हा फोटो नीना गुप्ता यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘फ्रॉक का शॉक’ गजराज सरांनी काढलेला फोटो, अशी कॅप्शन या फोटोला त्यांनी दिली आहे.
60 वर्षीय नीना गुप्ता या फोटोमध्ये अतिशय बोल्ड दिसत आहेत. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोला लाईक तसेच कमेंट्स केल्या आहेत. नेहमीच आपल्या बोल्ड लुक आणि स्टेटमेंटमुळे नीना गुप्ता चर्चेत असतात. त्या आता त्यांच्या या बोल्ड फोटोमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. नीनांनी या फोटोत पिवळ्या रंगाचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातलेला आहे. छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरला नीना गुप्ता यांनी सुरूवात केली आहे.
नीना यांनी त्यानंतर ‘नजदीकिया’, ‘मंडी’, ‘उत्सव’, ‘डॅडी’, ‘तेरे संग’, ‘दिल से दिया वचन’, अशा अनेक चित्रपटांत महत्त्वाची भूमिका केली. ज्याप्रमाणे नीना बोल्ड दिसतात त्याचप्रमाणे त्यांचे विचारही बोल्ड आहेत. 80 च्या दशकात त्यांनी वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यावेळी जगाची पर्वा न करता परंपरेला छेद दिला होता.
click and follow Indiaherald WhatsApp channel