महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी मागील आठवड्यात नगर जिल्ह्यातील पाथर्डी व जामखेड येथे सभा घेतल्या होत्या.आता दुसऱ्यांदा महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यात दि. 13 सप्टेंबर रोजी येणार आहे.याचदिवशी मुख्यमंत्र्यांच्या अकोले,संगमनेर व राहुरी येथे सभा होणार आहेत.या दौऱ्यात नगर शहरातील सभा टाळण्यात आली असून यात शहरात सभेऐवजी रोड शो करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा 25 व 26 ऑगस्टला नगर जिल्ह्यात नियोजित होती.मात्र,माजी केद्रींय मंत्री अरूण जेटली यांच्या निधनामुळे फ डणवीस यांनी 25 तारखेचा दौरा रद्द केला होता.त्यामुळे अकोले,राहुरी व नगर शहरातील सभा झाल्या नाहीत.दि.26 पासून महाजनादेश यात्रेस सुरवात करीत मुख्यमंत्र्यांनी पाथर्डी व जामखेड येथे सभा घेतल्या. आता, दि.13 रोजी मुख्यमंत्री पुन्हा नगर जिल्ह्यात येत आहेत.
सकाळी 11 वाजता संगमनेर येथे त्यांची सभा होईल.त्यानंतर दुपारी दोन वाजता लोणी येथे त्यांचा स्वागत कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर दुपारी 3 वाजता राहुरी येथे सभा घेतली जाणार आहे. राहुरीची सभा घेतली जाणार आहे.राहुरीची सभा संपल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता नगर शहरात रोड शो करण्यात येणार आहे.
या रोड शोनंतर मुख्यमंत्री नगरमध्येच मुक्कामी थांबणार आहेत. 14 सप्टेंबर रोजी सकाळीर् वाजता महाजनादेश यात्रा श्रीगोंद्याकडे रवाना होणार आहेत.काष्टी येथे स्वागत समारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री दौंडकडे सभेसाठी रवाना होणार आहेत.
दरम्यान, पूर्वीच्या महाजनादेश यात्रेत नगर शहरात मुख्यमंत्र्यांची सभा व मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील गांधी मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती.मात्र,त्यावेळी शहराबरोबरच राहुरी,संगमनेर व अकोल्याची सभा घेण्यात आली नाही.नवीन दौऱ्यात अकोले, संगमनेर व राहुरी येथे सभा होणार आहेत.मात्र,.शहरात सभा होणार नाही.
click and follow Indiaherald WhatsApp channel