वॉशिंग्टन: भारत आणि चीन हे दोन देश आता विकसनशील देश राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी या नावाखाली कोणतेही फायदे मी घेऊ देणार नाही असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेने भारताला असलेला व्यापार प्राधान्य दर्जा या आधीच काढून टाकला आहे.जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांनुसार आपण विकसनशील देश असल्याचे भासवून हे दोन्ही देश गैरफायदा घेत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.
भारतातर्फे अमेरिकेच्या मालावर मोठ्या प्रमाणात कर लागू केला जात असल्याबद्दल ट्रम्प यांनी सातत्याने आक्षेप घेतला आहे. आमच्या मालावर ते भरमसाठ कर लागू करणार आणि त्यांच्या मालावर मात्र ते विकसनशील राष्ट्रांच्या नावाखाली करसवलती मागणार हे आम्ही चालू देणार नाही असे ट्रम्प यांनी या आधीही अनेक वेळा नमूद केले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या व्यापारी प्रतिनिधीला विकसनशील देशाच्या नावाखाली जर कोणी आर्थिक लाभ उठवण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा देशाच्या विरोधात दंडात्मक कारवाईचे आधिकार प्रदान केले आहेत.
पेन्सिल्व्हीनीया येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की भारत आणि चीन हे अशियातील बलाढ्य अर्थव्यवस्था असलेले देश आहेत. ते आता विकसनशील देश राहिलेले नाहींत त्यामुळे त्यांना त्या अनुषंगाने होणारे आर्थिक लाभ घेता येणार नाहीत. आमच्याकडूनही त्यांनी वर्षानुवर्ष लाभ उपटला असा आरोपही त्यांनी केला.
click and follow Indiaherald WhatsApp channel