ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धोका नसल्याने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागत करतो, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
आघाडी सरकानेही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. आता त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणामुळे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर परिणाम होईल असं बोललं जात होतं. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाने इतर मागासवर्गीयांवर अन्याय होत नसल्याचं स्पष्ट झालंय, असं भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठा समाजाचं आरक्षण कादयेशीर कसोटीवर सिद्ध झाल्याने त्याचं स्वागत करत असल्याचं भुजबळांनी सांगितलं आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel