विधानसभा निकालातील नंबर गेममुळे शिवसेनेची पॉवर वाढली. त्यानंतर त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदासाठी भाजपला धमकावण्याचा प्रयत्न केला. असी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ” विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिलं तर भाजपने १०५ जागी विजय मिळाला. मात्र सरकार स्थापन करता आलं नाही. शिवसेनेने पहिल्या दिवसापासून बार्गेनिंगला सुरवात केली.

मात्र शिवसेना चर्चेला आली नाही. शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला. युतीत असताना आमच जे ठरलं होत ते आम्ही त्यांना द्यायला तयार होतो,. मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी आमच काही ठरलं नव्हत.”

त्यानंतर ते म्हणाले, ” शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यासाठी नकार दिल्यानंतर शिवसेनेने भाजपल धमकावण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून त्यांनी शिवसेनेला इतर पर्याय असल्याचे सांगितले. ज्या शिवसेनेचे नटे कधी मारोश्रीची पायरी उतरत नव्हते त्या नेत्यांनी इतरांच्या पायऱ्या झिझावल्या. असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सह्याद्री अतिथी गृहात पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: