केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन भेटली. तसेच त्यांच्या प्रकृतिची चौकशीदेखील केली. मागच्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृति बिघडली असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी सकाळीच जेटलींची भेट घेतली होती. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी आतापर्यंत जेटलींची भेट घेतली आहे. अमित शहा यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीदेखील जेटलींची भेट घेतली. याअगोदर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील जेटलींची भेट घेत त्यांच्या प्रकृतिची चौकशी केली.
मागील काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृति बिघडली आहे त्यामुळे त्यांना 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel