मुंबई : ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवले आहे त्या हॉटेलात साध्या वेशातील पोलीस आढळ्याने त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आमदारांवर नजर ठेवण्यासाठीच हॉटेलात साध्या वेशातील पोलिसांना पाठवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

रेनिन्सन हॉटेलमध्ये राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारांना ठेवल्यामुळे या हॉटेलात साध्या वेशातील पोलीस आढळून आल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या आमदारांना रेनिन्सन हॉटेलमधून हॉटेल ‘हयात’मध्ये हलवले आहे.

सरकारकडून आदेश मिळाल्याशिवाय हे पोलीस आमदारांची हेरगिरी करूच शकत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आज दुपारी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही भाजपकडून आमदारांना प्रलोभने दाखविण्यात येत असल्याचा आरोप केला होता. आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले होते.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: