भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा चौथ्या क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी करत नाहीये.त्याच्या याच कामगिरी माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने मोठे विधान केले आहे. लक्ष्मण याने म्हंटले आहे की,ऋषभ पंत हा आक्रमक खेळणारा फलंदाज आहे. पण, चौथ्या स्थानावर नेमकी कशी फलंदाजी करायची असते याचा अंदाज त्याला नाही. त्यामुळे त्याला पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवायला हवे असे मत त्याने व्यक्त केले आहे.

तसेच तो म्हणाला प्रत्येक खेळाडू बॅडपॅचमधून जात असतो. पंत खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. मागील सामन्यांमध्ये तो स्ट्राइक बदलतानाही दिसला होता. दुर्दैवानं त्याची फटक्यांची निवड चुकते आहे. असं असलं तरी २१ वर्षांच्या या खेळाडूवर विनाकारण दबाव टाकण्याची गरज नाही,’ असंही लक्ष्मण यावेळी म्हणाला.

चौथ्या क्रमांकावर सध्या श्रेयस अय्यर व हार्दिक पंड्या हे उत्तम पर्याय ठरू शकतात. ते अनुभवी देखील आहेत. पंतकडं सध्या महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जात आहे. या अपेक्षांचा एक वेगळा दबाव पंतवर आहे. त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी संघ व्यवस्थापनानं त्याच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करायला हवा असेहि लक्ष्मण याने यावेळी सुचवले.

दरम्यान पंतची कामगिरी सध्या चिंतेचा विषय झाली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे देखील पंतच्या कामगिरीवर नाराज आहेत. अशातच फलंदाजीतील त्याच्या क्रमाची चर्चा ऐरणीवर आली आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: