पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित करतांना 21 वं शतक भारताचं आहे असं म्हंटल आहे. या शतकात भारताला ते साधायचा एकच मार्ग आहे. स्वयंपूर्ण भारताचा. संकटातून संधी शोधायला हवी, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून दिला.

 

21 वं शतक भारताचं आहे. कोरोनापूर्वीचं जग समजून घ्यायची संधी आपल्याला मिळाली आहे. 21 वं शतक भारताचं असेल हे आपलं स्वप्न नाही, तर जबाबदारी आहे. पण याचा मार्ग काय? जगातली आजची स्थिती आपल्याला शिकवते आहे, सांगते आहे एकच मार्ग - स्वयंपूर्ण भारत आणि - आत्मनिर्भर भारत आपल्याकडे शास्त्रांत सांगितलेला हा एकच रस्ता आहे असं मोदींनी म्हंटल आहे.


जगभात आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यात आतापर्यंत पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या एका विषाणूने जगातल्या कोट्यवधी लोकांचे जीव धोक्यात आहेत. सारं जग जीव वाचवायच्या लढाईत गुंतलं आहे.

 

आपण कुणीच हे असं संकट यापूर्वी पाहिलेलं नाही. ऐकलेलंही नाही. मानवजातीसाठी हे सगळं अकल्पित आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. पण हरणं, थकणं, हार मानणं मानवाला मंजूर नाही.


20 लाख कोंटीचं आर्थिक पॅकेज जाहीर

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची माहिती दिली असून यामध्ये 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. तसेच हे पॅकेज जीडीपीच्या 10 टक्के असल्याचं पंतप्रधानांनी म्हंटल आहे.

 

आर्थिक पॅकेज जाहीर करताना प्रत्येकाचा विचार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. मोदींनी बोलतांना असंही म्हंटल आहे. की एक राष्ट्र म्हणून आज आपण महत्त्वाच्या वळणावर आहोत. जेव्हा कोरोनाचं संकट भारतावर आलं तेव्हा भारतात एकही पीपीई किट उपलब्ध नव्हत्या.

 

एन-95 मास्कचे उत्पादन नावापुरते होते. मात्र आता भारतात रोज दोन लाख पीपीई किट्स आणि दोन लाख मास्क तयार केले जात आहेत. हे आपण करु शकलो कारण आपण संकटाला संधीत रुपांतरित केलं. आज जगभरात आत्मनिर्भर शब्दाचा अर्थ आपण पूर्णपणे बदलला आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: