सोशल मीडिया साइट फेसबुक पुन्हा एकदा डेटा लीकमुळे चर्चेत आले आहे. यंदा तब्बल 419 मिलियन युजर्सचे फोन नंबर लीक झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार यामध्ये 133 अमेरिकन युजर्स, 18 मिलियन ब्रिटिश युजर्स आणि 50 मिलियन व्हिएतनाम युजर्सचा डाटा आहे.

सर्वर पासवर्डने सुरक्षित नसल्याने ही माहिती लीक झाली आहे. सिक्युरिटी रिसर्चर संयम जैन नुसार, 419 मिलियन फेसबुक युजर्सचा मोबाईल नंबर सार्वजनिक आहे.

संयम जैनने फेसबुकच्या ऑनलाइन डाटाबेसचा शोध लावला आहे, ज्यामध्ये 419 मिलियन युजर्सचे फोन नंबर लीक झाले आहेत. रिपोर्ट्नुसार, युजर आयडीपासून ते फोननंबर आणि युजर्सचे खरे नाव, जेंडर आणि देशाची माहिती देखील लिक झाली आहे.

सर्वरला पासवर्ड नव्हता. मात्र या रिपोर्टनंतर सर्वर ऑफलाइन करण्यात आला आहे. फेसबुकने या रिपोर्टवर म्हटले आहे की, हा डेटा जुना असून, तो याआधीच काढण्यात आलेला आहे. मागील वर्षीच कंपनीने यात बदल केले असून, त्यावेळी कंपनीने ते फिचर काढून टाकले आहे. या फिचरमुळे फोन नंबरद्वारे युजर्स कोणालाही शोधू शकतात.

तसेच, फेसबुकने असेही म्हटले आहे की, हा डेटा घेण्यात आला आहे. मात्र कोणतेही पुरावे नाहीत, ज्यामुळे युजर्सचे अकाउंट्स हँक झाले आहेत. याआधीही अनेकदा फेसबुक डेटा ब्रीच झालेले आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: