जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे.


देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1075 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

24162 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 67 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1823 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.

https://mobile.twitter.com/ANI/status/1255834831419781123?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1255834831419781123&ref_url=https%3A%2F%2Fwww.thodkyaat.com%2Ftotal-number-covid19-positive-cases-india-marathi-news%2F

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: