आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची खांदेपालट सुरू केली आहे. याची सुरुवात महापालिकेतील गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांची निवड करण्यात आली. लवकरच शहर पदाधिकाऱ्यांचीही आदला बदली केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

शहर वाढत असताना एकऐवजी दोन शहर प्रमुख, पाठोपाठ शहर उपप्रमुख अशा नेमणुका केल्यानंतरही मागील काही वर्षांपासून शहर शिवसेनेची घडी विस्कळीत झाली आहे. अंतर्गत लाथाळ्यांमुळे संघटनेची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जेमतेम १० नगरसेवक निवडून आले. नुकतेच लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सोबत युती झाली. त्यामुळे शिवसेनेला पालिकेच्या सत्तेत चंचू प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

मात्र, या वाटाघाटीतही स्थानिक नेतृत्व अपयशी ठरले. पालिकेतील विविध समित्यांवर नियुक्ती असो अथवा प्रभाग समिती सदस्य नियुक्ती असो शिवसेना नेतृत्वाच्या हेकेखोर आणि अवास्तव मागणीमुळे येथेही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना संधीपासून वंचित राहावे लागले. याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे बोलले जात असून याचमुळे चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांची शहर प्रमुख पदे स्थगित करण्यासोबत पालिकेतील  गटनेते संजय भोसले यांना बाजूला सारून त्यांच्या जागी पृथ्वीराज सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: