माद्रिद: जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्य स्पर्धेत भारताच्या १७ वर्षीय कोमालिका बारीने सुवर्ण पदक जिंकत मोलाची कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत तिने तिसरी भारतीय तिरंदाज होण्याचा मान मिळवला आहे. कोमलने अंतिम सामन्यात जपानच्या वाका सोनोडाला पराभूत करून कॅडेट महिला गटाच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
विजयानंतर कोमालीका म्हणाली की, “जागतिक जेतेपद मिळाल्याचा मला विशेष आनंद आहे. मला मिळालेले यश हे माझ्या प्रशिक्षकांमुळे शक्य झाले आहे,”
कोमालीका ही मूळ झारखंडची राहणारी आहे. या जागतिक स्पर्धेत १८ वर्षाखालील महिला गटाचे विजेतेपद पटकावणारी कोमालीका ही दुसरी भारतीय ठरली आहे. यापूर्वी २००९ मध्ये दिपिका कुमारीने याच गटात बाजी मारली होती आणि त्यानंतर तिने २०११ मध्ये २१ वर्षांखालील गटाचे जेतेपद नावावर केले होते. पल्टन हँस्डाने २००६ च्या जागतिक स्पर्धेत कनिष्ठ पुरुष गटातील कम्पाऊंड प्रकारात बाजी मारली होती
click and follow Indiaherald WhatsApp channel