दिग्विजय सिंह यांनी ‘पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी मुस्लीम कमी आणि गैर मुस्लीम अधिक काम करत आहेत तसेच भाजप आणि बजरंग दलाला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय पैसे देते, याकडे थोडं लक्ष द्या असं विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे देशात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेहमीच वादग्रस्त विधान करणारे कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि बजरंग दलाला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय पैसे देते असं विधान केले आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावरून टीकेची झोड उठत आहे.

यावरून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी ‘दिग्विजय सिंह चर्चेत राहण्यासाठी असं वक्तव्य करत आहेत. ते आणि त्याचे नेते पाकिस्तानची भाषा बोलतात. भाजप आणि आरएसएसची देशभक्ती सर्व जगाला माहित आहे’ असं विधान केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह यांनी भोपाळमधून निवडणूक लढवली होती. येथून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हरवले होते.                                                                                     


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: