सध्या राज्यात सत्तेवर असलेले सरकार हे तीन भिन्न विचारसरणी असल्याने ते जास्त काळ राहणार नाही. अल्पजीवी सरकार केव्हाही पायउतार होणार असल्याने पुन्हा भाजपलाच सत्तेत येण्याची संधी आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी जीव ओतून पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन खासदार प्रीतम मुंडे यांनी केले.

 

माजलगाव येथे तालुका कार्यकारिणी निवड बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप नेते रमेशराव आडसकर, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सरचिटणीस सुभाष धस, मोहन जगताप, राम कुलकर्णी, नितीन नाइकनवरे, हनुमान कदम, अरुण राऊत, डॉ.अशोक तिडके, संतोष यादव, सुरेश दळवे उपस्थित होते.

 

डॉ. मुंडे म्हणाल्या, “सध्या आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करून ताकद वाढविली तरच सत्ताधाऱ्यांना सक्षमपणे तोंड देऊ शकतो. जनतेने आपल्यालाच कौल दिला असला तरी ऐनवेळच्या घडामोडीमुळे आपण सत्तेत येऊ शकलो नाही. कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करावे; कारण पुन्हा भाजपच सत्तेत येणार” असल्याचा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, भाजप नेते रमेशराव आडसकर यांच्या पुढाकाराने माजलगावसह वडवणी, धारूर येथेही डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत संघटना निवडीसाठी बैठका झाल्या.                                                                        

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: