नवी दिल्ली : देशात कोरोनाचं थैमान सुरु असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशभरात काल (20 एप्रिल) दिवसभरात 705 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत 18 हजार 601 रुग्ण आढळले आहेत.

 

यापैकी 3 हजार 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 17.47 टक्क्यांवर आलं आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

 

केंद्रीय आरोग्य आणि गृहमंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत लव अग्रवाल बोलत होते. गेल्या 14 दिवसात 23 राज्यांमधील 61 जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

 

यात महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील लातूर उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


https://mobile.twitter.com/ANI/status/1252551283166154753?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1252551283166154753&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fnational%2Fcorona-patients-recover-in-india-health-ministry-said-705-corona-patients-recover-in-one-day-209829.html

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: