ऑस्ट्रेलियामध्ये एका भारतीय टॅक्सी ड्रायव्हरने पाकिस्तानी क्रिकेटर्सकडून भाड्याचे पैसे घेण्यास नकार दिला. टॅक्सी ड्रायव्हरचे हे वागणे पाकिस्तानी क्रिकेटर्सला एवढे आवडले की, त्यांनी त्या ड्रायव्हरला त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये जेवायला घातले.
भारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या टॅक्सीत ज्या खेळाडूंनी प्रवास केला त्यामध्ये शाहीन अफ्रिदी, लेग स्पिनर यासिर शाह आणि नसीम शाह हे होते. एबीसी रेडिओची कॉमेंटेटर मिशेलने ही गोष्ट ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनबरोबर कॉमेंट्री करताना शेअर केली.
एलिसनला या घटनेची माहिती टॅक्सी ड्रायव्हरने कॉमेंटेटर एलिसनला गाबा स्टेडिअम येथे सोडले तेव्हा मिळाली. त्यावेळी गाबा स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी सामना सुरू होता.
टॅक्सी ड्रायव्हरने एलिसनला सांगितले की, त्याने पाकिस्तानी खेळाडूंना रात्री हॉटेलमधून भारतीय रेस्टोरेंटमध्ये पोहचवले. याचे त्याने पैसे देखील घेतले नाही. त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांच्याबरोबर जेवण करण्याचे देखील आमंत्रण दिले.
click and follow Indiaherald WhatsApp channel