चीनची सर्वात मोठी स्पोर्ट्स वाहन निर्माती कंपनी ग्रेट वॉल मोटर्सने भारतीय बाजारात एन्ट्री केली आहे. भारतात या स्पोर्ट्स युटिलिटी ब्रांडने त्यांची हेवल लाँच केली आहे. एसइके मोटर कॉर्पसच्या मालकीच्या एमजी मोटर्स नंतर भारतीय बाजारात दाखल होणारी ग्रेट वॉल ही दुसरी चीनी कंपनी आहे. गेल्याचा महिन्यात ग्रेट वॉल मोटर्सने अमेरिकन वाहन निर्माती जनरल मोटर्सच्या तळेगाव येथील उत्पादन प्रकल्पाचे अधिग्रहण केले आहे.
कंपनीच्या जाहिरातीनुसार गेल्या १० वर्षात ग्रेट वॉल मोटर्सने उर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विकास यासाठी १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून भारतात टप्प्याटप्प्याने ७ हजार कोटी डॉलर्सची योजना कंपनीने तयार केली आहे.
कंपनीचे भारतातील सेल्स आणि मार्केटिंग प्रमुख हरदीपसिंग बरड म्हणाले भारत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे त्यामुळे अनेक ऑटो कंपन्याची भारत ही पहिली पसंती बनत आहे. ग्रेट वॉलने ऑटो एक्स्पो २०२० मध्ये ग्लोबल इंटेलिजंट एसयुवी ब्रांड हेवल सादर केली असून एसयूवीची पूर्ण रेंज कव्हर करण्याची योजना आखली आहे. भारतात कंपनीने लिथियम बॅटरी निर्माणासाठी गुंतवणूक केली आहेच पण येत्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन संदर्भात आवश्यक घटकांच्या उत्पादनासाठी कंपनी गुंतवणूक करणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel