लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. पिंपरीची जागा रिपाइंला मिळू नये, यासाठीच काही धर्मांध शक्तींनी माझ्या वाक्‍याचा विपर्यास केला. तरीही माझ्या अनावधाने केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो,’ अशा शब्दांत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुनश्‍च दिलगिरी व्यक्त केली.

आठवले आणि मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची मंगळवारी सकाळी नवीन विश्रामगृहात संयुक्त बैठक झाली. त्यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भगवानराव वैराट, नगरसेविका स्वाती लोखंडे, रमेश राक्षे, अंकल सोनावणे, राहुल डंबाळे, लहुजी वस्ताद स्मारक समितीचे अशोक लोखंडे, राजर्षी शाहू विकास संस्थेचे प्रकाश जगताप, दलित महासंघाचे आनंद वैराट, गणेश जाधव, विकास सातारकर, संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, यांच्यासह “आरपीआय’चे शहराध्यक्ष अशोक कांबळे, बाळासाहेब जानराव, चंद्रकांता सोनकांबळे, महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, अयुब शेख, अशोक शिरोळे, संजय सोनावणे, बाबुराव घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडियावरील मजकुरावर समाजाने अवलंबून न राहता सामाजिक एकोपा जपावा, असे आवाहन आठवले यांनी केले. अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना भारतरत्न मिळण्यासाठी पुढाकार घेणार असून, लवकरच मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणण्याचे आश्‍वासन आठवले यांनी या बैठकीत दिले.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: