काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. आज झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकमध्ये त्यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्ला चढवला. त्या म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील लोकांची दिशाभूल करीत आहे. केंद्रातील मोदी सरकार संविधानाला कमकुवत करीत आहे.
सरकारकडून लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असून लोकांचे सांप्रादायिकतेच्या आधारावर विभाजन केले जात आहे”. या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये नागरिकत्व संशोधन विधेयक (सीएए) या विरोधात झालेले आंदोलन आणि अनेक विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेली परिस्थिती, देशातील आर्थिक मंदी, बेरोजगारी, कृषि संकट, जेएनयू, जामिया मिल्लिया इस्लामिया यासारख्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या, “ पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे देशातील लोकांची दिशाभूल करीत आहेत. मोदी-शहा यांच्याकडून आक्षेपार्ह विधाने करण्यात आली असून त्यांनी असे करणे कायम ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकार संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. याविरोधात देशभरात आंदोलन करण्यात आली असून त्याला सीएए आणि एनआरसी हे तत्कालिक कारण आहे. परंतु, यामुळे व्यापक नैराश्य आले आहे. लोकांमध्ये प्रचंड राग आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांची वागणूक ही पक्षपाती आणि क्रूर होती आहे असं म्हणत त्यांनी या बैठकीत केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
या बैठकीला २० पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला, सीताराम येचुरी, डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राजदचे मनोज झा, अजित सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
click and follow Indiaherald WhatsApp channel