जम्मू आणि काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर सरकारला काही पक्षांनी पाठिंबा दिला तर काही पक्षांनी त्याचा विरोध केला. सरकारच्या या निर्णयाला सुरूवातीपासूनच एमआयएमने विरोध केला आहे. त्यातच आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सद्य परिस्थितीत कौरव आणि पांडव कोण आहेत असा सवाल केला आहे. दक्षिणेतील एका अभिनेत्याने सरकारच्या काश्‍मीरविषयीच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना कृष्ण आणि अर्जुनाची उपमा दिली होती. याचाच संदर्भ घेत ओवेसी यांनी सवाल केला. तसेच सरकारला देशात महाभारत घडवायचं आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

मोदी सरकारचं काश्‍मीरवर प्रेम आहे, तिथल्य काश्‍मिरींवर नाही. या सरकारला तिथले भूखंड, जमिनी प्रिय आहेत, तिथे कोण वास्तव्य करतं याच्याशी घेणं देणं नाही. यांना सत्ता प्रिय आहे मात्र न्याय नाही अशी टीका ओवेसी यांनी त्यांच्या भाषणात केली. एवढंच नाही तर मोदी सरकारचं काश्‍मीरवर प्रेम आहे पण तिथल्या नागरिकांवर नाही, त्यांना फक्त तिथले भूखंड प्रिय आहेत. त्याचमुळे काश्‍मीरच्या जनतेचं हित लक्षात न घेता निर्णय घेतले जातात असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. या सरकारला देशात महाभारत घडवायचं आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कलम370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका केली जाते आहे.             

Find out more: