आपली नखे सुंदर दिसावीत यासाठी महिला वर्ग विविध प्रकारचे नेलपॉलीश वापरतात. मग त्यात ड्रेस ला नेलपॉलीश शोभून दिसेल असे कलर आवर्जून घेतले जातात. अर्थात नेलपॉलीश खरेदी करताना त्याची किंमत विचारात घेतली जातेच. महागात महाग नेलपॉलीश किती रुपयांचे असेल असा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर ऐकून थक्क होऊ शकाल. जगातील सर्वात महागड्या नेलपॉलीश च्या किमतीत चक्क एक एसयुव्ही खरेदी करता येईल. लग्झरी ज्वेलरी डिझाईन करणारी अझेंचर कंपनी या साठी प्रसिद्ध आहे. त्यांनी बनविलेल्या नेलपॉलीशची किंमत आहे १ कोटी ५८ लाख रुपये प्रती बाटली.
या नेलपॉलीश ची खासियत म्हणजे ते लावण्यासाठी सेवा कर भरावा लागतो. या नेलपॉलीशने एक नख रंगविण्यासाठी १ लाख ९० हजार रु.खर्च येतो. या नेलपॉलीश मध्ये २६७ कॅरेट चे काळे हिरे (black diamonds) वापरले गेले आहेत. अर्थात हे नेलपॉलीश काही मोजक्या सेलेब्रिटीच खरेदी करू शकतील यात शंका नाही. याच कंपनीने २०१३ साली ९८ कॅरेट व्हाईट हिऱ्याचा वापर करूनही एक नेलपॉलीश तयार केले होते. ते सिंगर कॉरन ऑसबोर्न य टोनी ब्राक्सटन यांनी वापरल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी हे नेलपॉलीश लिलावात १० लाख डॉलर्स मध्ये विकले गेले होते.

click and follow Indiaherald WhatsApp channel