राज्यात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी परप्रांतीय मजूरांच्या मुद्यांसह काही महत्वाच्या सूचना मांडल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात, ‘कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं सरकार कसं निराकरण करणार आहे ? अगदी आयत्यावेळी सांगून जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही’.
click and follow Indiaherald WhatsApp channel