सांगली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु आहे. राज्यभरात राजकीय पक्षांचे प्रचार जोरदार सुरु आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. याच पार्श्वभुमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
कॉंग्रेस नेते स्वतः रिटायरयमेंटची भाषा करत आहेत त्यांनी खरोखर रिटायरयमेंट घ्यावी, असा टोला डॉ. प्रमोद सावंत यांनी लगावला. सांगलीचे भाजपा उमेदवार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते. महाराष्ट्र पुन्हा भाजप-शिवसेना महाआघाडीचे सरकार दोन तृतीयांश बहुमत घेऊन सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस फक्त आरोप करते. एक तरी आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले. उलट भाजपा सरकारचा विकास बघून काँग्रेस-राष्ट्रवादी मधील नेते भाजपात येत असल्याचेही ते म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel