जम्मू काश्मीर संदर्भात पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघात दाखल केलेल्या याचिकेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं नाव घेतल्या प्रकरणी, काँग्रेसनं पाकिस्तानवर टीका केली आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हा भारताचा अभिन्न भाग असून जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान हिंसा भडकावत असल्याचं, काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे.
काश्मीरसंबंधी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात दाखल केलेल्या याचिकेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेतल्याने कॉंग्रेसचे पित्त खवळले आहे. काँग्रेसने बुधवारी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले,पाकिस्तान जाणीवपूर्वक काश्मीरसंबंधी चुकीची माहिती पसरवत आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य अंग आहे. जम्मू-काश्मीर ऐवजी पाकिस्तानने पीओके, बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल जगाला उत्तर द्यावे असे सूरजेवाला म्हणाले.
याविषयी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले आहे यामध्ये त्यांनी ‘माझे भाजप सरकारसोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, हे मी स्पष्ट करतो. यामध्ये पाकिस्तान किंवा इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात पाकिस्तानसह चीन आणि अमेरिकेलाही इशारा देईल आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel