भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अबुधाबी दौ-यावर आहेत. त्यांना 'यूएई'चा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ  झायेद' या पुरस्काराने गौरविण्यात आले. मोदींनी हा पुरस्कार स्वीकारण्याआधी 'यूएई'चे शासक यांच्यासोबत उच्चस्तरीय चर्चा केली.

अबुधाबीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी यूएईचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. मोदी म्हणाले, दुबईला खास शहर बनवण्यासाठी लाखो भारतीयांनी योगदान दिले आहे. भारत-यूएईचे संबंध अधिक दृढ होत आहेत. अनेक भारतीय नागरिक आज दुबईत सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत. 

मोदींनी युएईच्या माध्यमांना मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर या निर्णयाचे पडसाद यूएई आणि भारताच्या संबंधावर पडणार नाहीत. दहशतवादाविरोधातील लढाईत यूएई नेहमीच भारताच्या बाजुने राहिला आहे, भारत-युएईचे संबंध दृढ आहेत व पुढेही राहतील, असाही त्यांनी विश्वास दिला. 

मोदी आज यूएईहून बहरीनला जाणार आहेत. बहरीनमध्ये ते एका प्राचीन मंदिराचे उद्धाटन करणार आहेत. 


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: